‘Home Quarantine’ प्रवाशांच्या बोटाला लावली जाणार शाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Untitled-218.png)
घरामध्येच विलगीकरण करण्यात आलेल्या व्यक्तींना निवडणुकांमध्ये मतदान केल्यानंतर जशी बोटाला शाई लावली जाते त्यापद्धतीने शाई लावून मार्क केलं जाणार आहे..याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आरोग्य खात्याची मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर टोपे यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केला. यामध्ये त्यांनी रुग्णांची तीन प्रकारांमध्ये वर्गिकरण करण्यात येणार असल्याचही सांगितलं आहे.
राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३८ झाल्याची माहिती टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. करोनाग्रस्त देशांच्या यादीमध्ये दुबई, अमेरिका आणि सौदी अरेबिया या तीन नवीन देशांचा समावेश करण्यात आला आहे. या देशांमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना होम क्वॉरंटाइन करण्यात येणार असून त्यांना मतदानानंतर करतात त्याप्रमाणे शाई लावून मार्क करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं.
करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या रुग्णांची तीन प्रकारांमध्ये विभागी करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. “दहा करोनाग्रस्त देशांमधून येणाऱ्या लोकांना ए, बी आणि सी प्रकारामध्ये विभागले जाणार आहे. ए मध्ये थेट लक्षणे दिसणे लोक, बी मध्ये वयस्कर लोकं आणि कुठलीही लक्षणे न दिसणारी तरुण मुले सी कॅटेगरीमध्ये असतील,” असं टोपे यांनी सांगितलं. ए आणि बी मधील प्रवाशांची चाचणी करुन त्यांच्यावर उपचार केले जातील. तर लक्षणे न दिसणाऱ्या सी प्रकारातील प्रवाशांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना होम क्वॉरंटाइन केलं जाणार आहे…