Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका! एलपीजी सिलेंडरचे दर वाढले, आता मोजावे लागतील ‘इतके’ पैसे

LPG Price Hike :  देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारने थेट 50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारा 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर आता ₹503 वरून ₹553 रुपयांचा झाला आहे, तर सामान्य ग्राहकांना एलपीजी गॅससाठी 803 रुपयांऐवजी आता ₹853 रुपये मोजावे लागणार आहेत.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. भारतात यापूर्वी काही काळ गॅस दरात स्थिरता होती, मात्र जागतिक बाजारात होणाऱ्या वाढीचा परिणाम आता आपल्या देशावरही होऊ लागला आहे. त्यामुळे दरात ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महत्त्वाचे म्हणजे, 8 मार्च 2024 रोजी महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत ₹100 ची कपात केली होती. त्यावेळी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडर ₹903 रुपयांवर आला होता. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 पासून सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. तब्बल आठ महिन्यांनंतर, एप्रिल 2025 मध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर दिल्लीत 803 रुपये, मुंबईमध्ये 802.50 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. आता या किंमतीत 50 रुपयांनी वाढ आहे.

हेही वाचा –  ‘पीएमआरडीए’ला जागा हस्तांतरित करण्याऐवजी वापरास दिली जाणार

दुसऱ्या बाजूला, व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र 1 एप्रिल 2025 रोजी ₹44.50 ची कपात करण्यात आली. यामुळे दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलेंडर 1803 रुपयांवरून थेट 1762 रुपयां आला. कोलकातामध्ये तो 1913 रुपयांवरून 1868.50 रुपयांवर गेला आहे.

याशिवाय, केंद्र सरकारच्या महसूल विभागाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्यूटी) प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नवे दर आज मध्यरात्री 12 वाजेपासून लागू होणार आहेत.

अचानक झालेल्या या दरवाढीचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे. आधीच खाद्यपदार्थ, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना एलपीजी सिलेंडर महाग झाल्यामुळे अनेक कुटुंबांना महिन्याचा खर्च चालवणे कठीण होणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button