राज्यात पावसाचा जोर कायम राहणार; कोकणात रेड अलर्ट जारी…

Weather Update : राज्यात पावसाचे पुन्हा एकदा आगमन झाले आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस रविवारी देखील कायम राहणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. राज्यात 20 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम असणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्याने या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मध्य, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून आज कोल्हापूर ते पुणे घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा – देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीत काय चर्चा झाली, संजय राऊतांनी सांगितलं, म्हणाले एकाच वेळी…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाची संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह झालेल्या एन्ट्रीने नागरिकांची मोठी धावपळ झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Weather Update |
दरम्यान, गेल्या 10 ते 12 दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी तर ढगफुटीसदृश पावसाचे दृश्य दिसत आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.