Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील ‘या’ सहा जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा; हवामान विभागाकडून खबरदारीचे आवाहन

पुणे | राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने मुंबईसह महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांमध्ये दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात चिंताजनक वाढ झाली आहे. घराबाहेर पडणाऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे तसेच दुपारी घरून निघताना पाणी सोबत ठेवण्याचे आवाहनही हवामान विभागाने केले आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच अतिशय कडक ऊन जाणवत आहे. पुढील काही दिवस उष्णता कायम राहणार असून, त्यामुळे राज्यभरात तीव्र तापमानाचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा  :  हिंजवडी परिसरात परदेशी महिलांकडून वेश्या व्यवसाय

कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातील तापमान सामान्यपेक्षा पाच अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले गेले आहे. फेब्रुवारीत पारा सामान्यपेक्षा जास्त नोंदवला गेल्याची एका दशकातील ही चौथी वेळ आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या दोन दिवसांत कोकणातील बहुतांश भागात तीव्र उष्मा वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत कोरडे हवामान अनुभवायला मिळेल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button