Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

एचडीएफसी बँकेची युपीआय सेवा दोन दिवस काही तासांसाठी बंद

फोनपे-गुगलपे दोन दिवस बंद राहणार

मुंबई : भारतातील जवळपास सर्वच लोक युपीआय पेमंट करतात. त्यामुळे आता रोख रक्कम सोबत बाळगणे गरजेचे नाही. मात्र आता डिसेंबरमध्ये एचडीएफसी बँकेची युपीआय सेवा दोन दिवस काही तासांसाठी बंद राहणार आहे. याबाबत बँकेने माहिती दिली आहे. बँकेने म्हटले की, सिस्टम अपग्रेड करण्यासाठी आणि ग्राहकांना दिलेल्या सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे तांत्रिक काम आवश्यक आहे. त्यामुळे 13 डिसेंबर आणि 21 डिसेंबर रोजी पहाटे 2:30 ते सकाळी 6:30 या काळात 4 तासांसाठी युपीआय सेवा बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एचडीएफसी बँक खात्यांतून पेमेंट करता येणार नाही
एचडीएफसी बँकेने यूपीआय सेवा बंद राहणार असल्याची माहिती देताना म्हटले की, 13 डिसेंबर आणि 21 डिसेंबर रोजी पहाटे 2:30 ते सकाळी 6:30 या काळात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना आपल्या खात्यातून कोणतेही यूपीआय व्यवहार करता येणार नाहीत. सेव्हिग आणि करंट खात्यांमधून यूपीआय पेमेंट, एचडीएफसी बँक रुपे क्रेडिट कार्डमधून यूपीआय पेमेंट, मोबाइलबँकिंग अॅप्सद्वारे पैसे पाठवता येणार नाहीत. तसेच थर्ड-पार्टी अॅप्स (फोनपे, गुगल पे, पेटीएम) द्वारे पेमेंट करता येणार नाही.

हेही वाचा        :          सोसायटी फेडरेशनतर्फे भव्य सर्वरोग महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसादाची अपेक्षा

पेझॅप वॉलेट वापरण्याचा सल्ला
युपीआय पेमेंट बंद असणाऱ्या काळात ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी बँकेने ग्राहकांना या काळशात PayZapp वॉलेट वापरण्याचा सल्ला दिला आहे. या काळात PayZapp वापरताना कोणताही व्यत्यय येणार नाही. यासाठी तुम्हाला Google Play Store किंवा Apple App Store वरून अॅप डाउनलोड करावे लागेल.

यानंतर मोबाइल नंबर टाकून OTP द्वारे लॉगिन करावे लागेल. त्यानंतर बँक-आधारित संपूर्ण KYC किंवा पॅन-आधारित KYC बेसिक केवायसी करावी लागेल. त्यानंतर तुम्ही या खात्यात पैसे जमा करू शकता आणि पेमेंट करू शकता. PAN-आधारित KYC केली तर मासिक आणि वार्षिक मर्यादा ₹10,000 ते ₹1,20,000 पर्यंत असेल. बँक-आधारित KYC केली तर ही मर्यादा वार्षिक 10 लाखांपर्यंत वाढते. त्याचबरोबर PayZapp वर तुम्हाला कॅशपॉइंट्स मिळतात, हे तुम्ही रिडीम करू शकता. अ‍ॅपच्या होमपेज किंवा मेनू बारवरील कॅशपॉइंट्स आणि ऑफर्सवर क्लिक करून तुम्ही कॅशपॉइंट्स वॉलेटमध्ये ट्रान्सफर करू शकता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button