ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गीता जयंती सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण

श्रीकृष्णाची कृपा राहण्यासाठी गीता जयंतीच्या दिवशी काही विशेष उपाय

महाराष्ट्र : गीता जयंती हा सण हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण जो दरवर्षी साजरा केला जातो. गीतेमध्ये मोक्ष प्राप्तीचा मार्ग सांगितला आहे. मोक्ष म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे किंवा मुक्ती. गीता जीवन जगण्याची कला शिकवते. भागवत गीतेच्या शिकवणीचे स्मरण आणि उत्सव साजरा करण्यासाठी गीता जयंती साजरी केली जाते. गीता जयंतीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणांगणात अर्जुनाला गीतेचा उपदेश केला होता. गीता जीवन, कर्म, धर्म आणि मोक्ष या तत्वांबद्दल सखोल ज्ञान देते. गीता जयंतीच्या दिवशी गीतेच्या ज्ञानाचा प्रकाश पसरतो. गीतेमध्ये कर्मयोगाचे महत्त्व सांगण्यात आले आहे. माणसाने आपले काम निस्वार्थपणे करत राहिले पाहिजे. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही संयम आणि शांतता ठेवावी असे गीता शिकवते. गीतेचा अभ्यास हा आध्यात्मिक विकासास मदत करतो. गीता आपल्याला आपल्यातील देवाशी जोडण्याचा मार्ग दाखवते.

कधी आहे गीता जयंती?
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला गीता जयंती साजरी केली जाते. यावर्षी गीता जयंती 11 डिसेंबर रोजी पहाटे 3:42 मिनिटांनी सुरू होईल आणि 12 डिसेंबर रोजी पहाटे 1:09 मिनिटांनी संपणार आहे. गीता जयंती 11 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे.

गीता जयंतीला करा हे खास उपाय
1. गीता जयंतीच्या दिवशी भगवद्गीतेचे वाचन करणे शुभ आणि पुण्य कर्म मानले जाते. गीतेचे ज्ञान जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण करते आणि गीतेच्या वाचनाने व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त होते.

2. गीता जयंतीच्या दिवशी विधीप्रमाणे श्रीकृष्णाची पूजा करावी. कृष्णाच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर दिवा, उदबत्ती लावून फुले अर्पण करावी.

3. गीता जयंतीच्या दिवशी उपवास केल्याने मनःशांती मिळते आणि असे म्हणतात की या दिवशी उपवास केल्याने श्रीकृष्णांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

4. या दिवशी गरिबांना पैसे, अन्न, कपडे दान करा. या दिवशी दान केल्याने पुण्य मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

5. गीता जयंतीच्या दिवशी “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप केल्याने कृष्ण प्रसन्न होतील.

6. भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहे. गीता जयंतीच्या दिवशी तुळशीची पूजा करून श्रीकृष्णाला तुळशीची पाने अर्पण करा.

7. गीता जयंतीच्या दिवशी महादेव आणि पार्वती ची पूजा करा. गीता जयंतीच्या दिवशी प्रत्येकाने गीतेचा ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

गीतेचे वाचन आणि अभ्यास केल्याने आत्मज्ञान प्राप्त होते तसेच गीतेमुळे जीवनाचा योग्य मार्ग कळतो. गीतेच्या शिकवणीचे पालन केल्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होतो. गीता जयंतीच्या दिवशी पूजा, मंत्र, जप आणि दान केल्याने सुख समृद्धी येते आणि गितेच्या ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो. गीता जयंतीच्या दिवशी पूजा, मंत्र जप, दान केल्याने श्रीकृष्णांची कृपा होऊन जीवनात यश प्राप्त होते.

गीतेमध्ये जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे. या उपायांचे पालन करून आपण गीतेचे ज्ञान आपल्या जीवनात आत्मसात करू शकतो आणि चांगले जीवन जगू शकतो. हे उपाय फक्त गीता जयंतीच्या दिवशीच नाही तर वर्षभर देखील करता येतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button