Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शिंदे- फडवीस सरकारला पहिला हादरा, आमदार बच्चू कडू यांचा ‘प्रहार’
मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारला पायउतार करुन सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार हादरा बसण्याची शक्यता आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा महायुतीतील घटक पक्ष प्रहार’चे नेते व आमदार बच्चू कडू उद्या राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील शाब्दिक संघर्षही वाढला होता.
दरम्यान, बच्चू कडू यांनी ट्विटटरवर सूचक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या साठी कार्यकर्ता महत्वाचा आहे, कार्यकर्त्यासाठी उद्याचा दिवस महत्वाचा, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन उद्या भुमिका स्पष्ट करणार..!
त्यामुळे बच्चू कडू उद्या कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.





