रत्नागिरीत कोरोनाचा उद्रेक; जिल्ह्याधिकारी कार्यालयात 38 जण पॉझिटिव्ह
![50,848 new corona patients in India in 24 hours; 1,358 coronabals](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/coronavirus_.jpg)
मुंबई – महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. आता कोरोनाचा शिरकाव सरकारी कार्यालयातही झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात 38 जण कोरोनाबाधित सापडल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35,78,160 वर
रत्नागिरीत कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण प्रवास करू नका, असे आवाहन जिल्हाधिकारी मिश्रा यांनी केले आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयातील तब्बल 38 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी 300 हून अधिक कोरोना रुग्णांची भर पडली आहे. 24 तासांत जिल्ह्यात नव्याने तब्बल 324 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच बुधवारी 66 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.