वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
पश्चिम महाराष्ट्र विभागाची साताऱ्यात बैठक; विविध पदांवर निवडी जाहीर, विक्रेत्यांच्या हितासाठी प्रयत्नांची ग्वाही

सातारा : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाची बैठक साताऱ्यातील पत्रकार भवन येथे नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शिवगोंडअण्णा खोत होते. यावेळी सरचिटणीस विकास सूर्यवंशी, उपाध्यक्ष रघुनाथ कांबळे तसेच पुणे वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष विजय पारगे उपस्थित होते.
बैठकीत पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये विकास सूर्यवंशी यांची राज्य व्यवस्थापन समिती सदस्यपदी, विजय पारगे यांची उपाध्यक्षपदी, तर रघुनाथ कांबळे यांची संघटन सचिवपदी निवड करण्यात आली.
हेही वाचा – संत साई शाळेत पालक रत्न पुरस्कार सोहळा उत्साहात

तसेच, संघटनेचे अध्यक्ष सुनील पाटणकर यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्ह्यातून अरुण निवंगुणे यांची राज्य संघटनेच्या सल्लागारपदी आणि दत्तात्रय पिसे यांची राज्य संघटना सदस्यपदी निवड करण्याची शिफारस करण्यात आली. या बैठकीस विजय पारगे, रघुनाथ कांबळे, अण्णा गुंडे, विकास सूर्यवंशी, सचिन चोपडे, राजेंद्र माळी, गणेश माळी, अंबादास शिंदे, उत्तम चौगुले यांच्यासह किरण व्हनगुत्ते, अंकुश परब, परशराम सावंत, शिवानंद रावळ, यतीन चौधरी, यशवंत वाधवणे, राजेश रसाळ, अविनाश जगताप, अमित जाधव, संजय फाटक, अमोल साबळे, राहुल चिंचकर आदी उपस्थित होते.
यावेळी विजय पारगे म्हणाले की, वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हितासाठी पुणे जिल्हा संघटना नेहमी पुढाकार घेईल. तसेच ग्रामीण भागातील एजंटांनाही न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. कार्यक्रमाचे आयोजन सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र माळी, गणेश पवार, ताजुद्दीन आगा, भास्कर भोरे, लहुराज लवळे आणि हमीद खान यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजेंद्र माळी यांनी केले.





