ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रावेतमध्ये दिवसाढवळ्या घरफोडी; १५ लाखांहून अधिक ऐवज लंपास

पिंपरी | रावेत परिसरात भरदिवसा घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचा कोयंडा तोडून तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ मे २०२६ रोजी सकाळी १०.४५ ते दुपारी १२.३० वाजण्याच्या दरम्यान रावेत गावठाण येथील स्वामी समर्थ सोसायटीजवळील बबाई बिल्डिंगमधील फ्लॅट क्रमांक २०१ मध्ये घडली. फिर्यादी मनोज अशोक भोंडवे (वय २५, रा. रावेत) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

हेही वाचा

सोसायटीधारकांच्या न्याय हक्कांसाठी फेडरेशन कटिबद्ध!

अज्ञात चोरट्यांनी घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि घरातील १७८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ७५ ग्रॅम चांदीचे दागिने तसेच १ लाख ४५ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण १५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

या प्रकरणी रावेत पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१(३) व ३०५ अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिळे करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button