Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

शरद पवारांनी खरंच हिंदू देवांचे बाप काढले? राष्ट्रवादीने समोर आणला संपूर्ण व्हिडिओ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ भाजपकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. पवार यांनी हिंदू देवी-देवतांचा बाप काढत अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र हा व्हिडिओ अर्धवट असून भाजपकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा पलटवार करत राष्ट्रवादीने शरद पवार यांच्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात एका कवितेचा संदर्भ देत तिचा अर्थ सांगितला होता. मात्र भाजपने एडिटेड व्हिडिओ व्हायरल केला, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. ‘झूठ की उम्र तब तक होती है जब तक सच का सामना नहीं होता. भाजप हा अर्धवटरावांचा पक्ष आहे हे आता सर्वज्ञात आहे, पण अर्धे मुर्धे व्हिडिओ दाखवून, अर्धी कच्ची लोणकढी थाप मारून, पूर्ण सत्य लपवता येत नाही. निदान पूर्ण व्हिडिओ दाखवण्याची अर्धांश हिम्मत तरी ठेवायची होती,’ असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.

  • भाजपने काय टीका केली होती?

    शरद पवार नेहमीच हिंदू धर्माची बदनामी करतात. जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते, असा निशाणा साधत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शरद पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला होता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button