महाराष्ट्रात मृत्यूतांडव सुरूच; नागपुरात २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू
![Death spree continues in Maharashtra; 25 patients died in Nagpur in 24 hours](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/indira-gandhi-rugnalaya-nagpur-780x470.jpg)
मुंबई : नांदेड, छत्रपती संभाजीनगर नंतर आता नागपूर मेडिकल महाविद्यालय व इंदिरा गांधी शासकीय विद्यालयात गेल्या २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
नांदेड येथील शासकीय रुग्णालयात तब्बल ३१ रुग्णांचा मृत्यू झाला होता. तर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात देखील २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर नागपूर येथील दोन शासकीय रुग्णालयात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा चव्हाट्यावर आली आहे.
हेही वाचा – लंडनहून वाघनखं भारतात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी
नागपूरच्या शासकीय दवाखान्यातील रुग्णांची आकडेवारी पहिली असता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयातील गेल्या २४ तासांत २५ रुग्णाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. यातील १६ रुग्ण हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर ९ रुग्ण हे इंदिरागांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यातले आहेत. यातील १२ रुग्ण हे खासगी दवाखान्यातून ऐन वेळेवर आल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यांच्या रुग्णालयातील मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी शेवटच्या क्षणाला अत्यवस्थेतील व्हेंटिलेटरवरचे रुग्ण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.