राज्यावरील चक्रीवादळाचं संकट टळलं? मान्सूनही लांबला
![Cyclone crisis over the state averted](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Weather-Update-1-780x470.jpg)
पुणे : खोल अरबी समुद्रात तयार होत असलेलं ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीपासून खोल समुद्रात सुमारे एक हजार किलोमीटर दूर असल्याचं हवामान खात्याच्या सूत्रांकडून आणि अभ्यासकांकडून सांगितलं जात आहे.
चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम जाणवणार नाही. तसंच त्यामुळे येणाऱ्या पावसाचीही शक्यता नाही. चक्रीवादळाबाबत घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. पश्चिम दिशेनं येणारं हे संभाव्य चक्रीवादळईशान्येला पाकिस्तानात धडकू शकेल, अशी माहिती हवामानअभ्यासकांनी दिली आहे.
हेही वाचा – सोशल मीडियावर व्हायरल तलाठी महाभरतीची ‘ती’ जाहिरात बोगस?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/image-17.png)
पश्चिम दिशेनं येणारं हे संभाव्य चक्रीवादळ ईशान्येला पाकिस्तानात धडकू शकेल, अशी माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. मात्र या काळात मच्छीमारांनी खोल समुद्रात जाणं धोकादायक ठरू शकतं. फयान चक्रीवादळामुळे रत्नागिरीतील मच्छीमारांना याची निश्चित जाणीव आहे. मात्र या चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन लांबणीवर जाणार असून त्यामुळे समस्या निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे.