breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोशल मीडियावर व्हायरल तलाठी महाभरतीची ‘ती’ जाहिरात बोगस?

Talathi Bharti 2023 : सध्या खासगी वेबसाइटवर, व्हॉट्सॲपसारख्या माध्यमातून बोगस जाहिरातींचा भडिमार सुरू असून युवकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने प्रारूप जाहिरातीचा नमुना प्रसिद्ध झाला असून, त्याद्वारे ४ हजार ६२५ तलाठ्यांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

mahabhumi.gov.in या साइटवर तलाठी भरतीची जाहिरात आल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. वास्तविक, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात या साइटवर उपलब्ध नाही. यासंदर्भात अधिक चौकशी केली असता, अशा प्रकारची कोणतीही जाहिरात शासनाच्या वतीने प्रसिद्ध झाली नसल्याचे एका वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – ‘धार्मिक मुद्ध्यांना सत्ताधारी अधिक प्रोस्ताहन देत आहेत’; शरद पवार यांचा सरकारवर निशाणा

मेगा भरतीच्या नावाखाली मागील शासनाने प्रत्येक उमेदवाराकडून ३५० ते ६०० रूपये फी घेऊन कोणतीही भरती केली नाही. तसेच यावेळीही महा भरतीच्या नावाखाली ९०० ते १००० रूपये परीक्षा फी घेऊन युवकांची पिळवणूक केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button