Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#Coronolockdown:महाराष्ट्राला 28 दिवसात 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित
मुंबई : केंद्रीय गृह मंत्रालयाने लॉकडाऊनच्या नियमात अंशतः शिथिलता आणत एकल दुकानांमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. महाराष्ट्रात 8 हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाली असून महिन्याभरात राज्य सरकारला मद्यविक्रीतून 2100 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात देशी दारुची 3 हजार 327 आणि विदेशी मद्याची 1 हजार 348 दुकानं, तर 3 हजार 463 वाईन शॉप सुरु झाली आहेत. राज्यात आठ हजार दुकानांमध्ये मद्यविक्री सुरु झाल्याने दररोज 80 कोटींच्या महसुलाची सरकारला अपेक्षा आहे. मे महिन्याच्या अखेपर्यंत 2100 कोटी रुपयांचा महसूल राज्य सरकारला अपेक्षित आहे. 4 मेपासून राज्यात मद्यविक्री सुरु झाल्याने 28 दिवसात 2100 कोटी मिळण्याची आशा आहे.





