Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
#CoronaVirus: मुंबईतले कोरोनाग्रस्त ४९० वरुन थेट ५९०, २४ तासात पाच जणांचा मृत्यू
मुंबईकरांची काळजी वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कारण गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ही ४९० वरुन थेट ५९० झाली आहे. तर मागील चोवीस तासांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत करोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या चाळीसवर पोहचली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे.
100 new #COVID19 cases and 5 deaths have been reported in Mumbai today. Death toll rises to 40. Total number of positive cases in Mumbai stand at 590: Public Health Department, Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) April 7, 2020





