#CoronaVirus | जळगाव जिल्ह्यातील 21 जण कोरोनामुक्त
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/1-8.jpg)
जळगाव | कोरोनावर मात करीत जळगाव जिल्ह्यातील आणखी 21 जण राञी आपापल्या घरी परतले. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक व समाधानाची बाब आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे कोविड हाॅस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे.
याठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित 172 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीमध्ये अमळनेर येथील 9, भुसावळ येथील 7, जळगाव येथील 5 व्यक्तींचा समावेश आहे. तर यापूर्वीच जळगाव व अमळनेर येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील 23 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. येथील महाविद्यालयात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आवश्यक तो कालावधी पूर्ण झाल्याने तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नसल्याने त्यांना आज रात्री रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.