Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Coronavirus: चोवीस तासात ७५ पोलिसांना कोरोनाची लागण; एकूण संख्या १९६४ वर

राज्यात गेल्या चोवीस तासात तब्बल ७५ पोलिसांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. करोनाशी लढताना या साथीच्या आजाराची लागण रोखणं हे महाराष्ट्र पोलिसांसमोरील सर्वात मोठं आव्हान आहे.

गेल्या चोवीस तासात भर पडलेल्या पोलिसांच्या रुग्णसंख्येमुळं राज्यातील एकूण करोनाबाधित पोलिसांची संख्या १९६४वर पोहोचली आहे. तर एकूण २० पोलिसांचा आजवर करोनामुळं मृत्यू झाला आहे. तर एकूण ८४९ पोलीस या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १०९५ पोलीस रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button