Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याचा विचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे

सध्या राज्यातील करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्यावर विचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसंच मुंबईतल्या बाधितांना शहराबाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. टोपे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.





