संजय राठोडांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी
मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गच्छंतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली असून तो आजच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे.
वाचा :-जळगाव वसतिगृह महिला शोषण प्रकरणी गृहमंत्र्यांची क्लीनचीट
अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने भाजपकडून टीका करण्यात आली होती. ठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल भाजप आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला होता.





