मुख्यमंत्र्यांचा केवळ ‘दर्शनाचा कार्यक्रम’, प्रवीण दरेकरांचे टीकास्त्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/Pravin-Darekar-1.jpg)
मुंबई – तौक्ते चक्रीवादळाने कोकणाला मोठा तडाखा दिला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत चक्रीवादळाने प्रचंड नुकसान केले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांचा हा केवळ दर्शनाचा कार्यक्रम असल्याची टीका केली आहे.
दरेकर यांनी ट्विट करत म्हटलंय, ‘विरोधी पक्षनेते तीन दिवस, मुख्यमंत्री तीन तास, विरोधी पक्षनेते कोकणवासीयांच्या बांधावर जाऊन विचारपूस, मुख्यमंत्र्यांचा केवळ दर्शनाचा कार्यक्रम.’
कोकणात चक्रीवादळ नुकसानीची पाहणी!
विरोधी पक्ष नेते…
'तीन दिवस'मुख्यमंत्री…
'तीन तास'विरोधी पक्ष नेते,
कोकणवासीयांच्या बांधावर
उंबरठ्यावर जाऊन विचारपूसमुख्यमंत्र्यांचा,
केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम'— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 21, 2021
दरम्यान, पाहणी दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनीही विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विरोधकांना टोला लगावला आहे. विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी ‘हेलिकॉप्टरमधून पाहणी करून तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय’, असे सांगत मोदींवर निशाणा साधला. तसेच ‘मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही’, असेही ते म्हणाले.