breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई
Monsoon Update : राज्यात आज पावसाची शक्यता, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पुणे : राज्यातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे. तर कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा – Great Indian Festival सेलची तारीख अमॅझॉनने बदलली, ‘या’ तारखेपासून मिळणार डिस्काऊंट
दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यापासून पूर्वमध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा उत्तर-ईशान्येकडे सरकला असून ३० सप्टेंबरला दक्षिण कोकण किनाऱ्याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रावर साडेपाच वाजता केंद्रीत झाला. आज रात्रीपर्यंत कमी दाबाचा पट्टा कोकण-गोवा किनारा, पणजी ते रत्नागिरी दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे.