breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

Great Indian Festival सेलची तारीख अमॅझॉनने बदलली, ‘या’ तारखेपासून मिळणार डिस्काऊंट

Great Indian Festival : ॲमेझॉनचा सर्वात मोठा सेल, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आता ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यापूर्वी ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉननं १० ऑक्टोबरपासून सेल सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. परंतु नंतर फ्लिपकार्टची तारीख आल्यानंतर सेलची तारीख बदलण्यात आली. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल ८ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार आहे.

फ्लिपकार्टनं फेस्टिव्ह फ्लॅकशिप सेल केव्हा सुरू होणार याची तारीख नंतर जाहीर केली. त्यानंतर ॲमेझॉननं त्यांच्या सेलची तारीख बदलली आहे. फ्लिपकार्टकडून सणांच्या सुरुवातीला बिग बिलियन डेज सेल चालवला जातो. बहुतेक दोन्ही कंपन्यांचा सेल एकाच वेळी चालतो.

हेही वाचा – पवना धरण १०० टक्के भरलं, नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू 

ॲमेझॉननं अद्याप आपला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल कधी संपणार हे सांगितलेलं नाही. फ्लिपकार्टचा सेल ८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि १५ ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button