Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

..तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत; अजित पवार गटाच्या मंत्र्याचं विधान

Dhananjay Munde | संतोष देशमुख हत्याप्रकरणाला महिना उलटला तरीही त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालेला नाही. वाल्मिक कराडविरोधात मकोका लावण्यात आलेला नाही. तसेत कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. त्यामुळे संतापलेल्या धनंजय देशमुख यांनी सोमवारी (१३ जानेवारी) तीव्र आंदोलन केलं. धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. यावरून राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार) नेते हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुश्रीफ यांनी सोमवारी संध्याकाळी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, की मी धनंजय देशमुख यांच्या आंदोलनासंदर्भात माहिती घेतलेली नाही, त्यामुळे मला त्यावर काही वक्तव्य करता येणार नाही. परंतु, संतोष देशमुख हत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने सांगितलं आहे की या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना आम्ही कडक शासन करू. माझ्या माहितीप्रमाणे या हत्या प्रकरणातील जवळपास सर्व आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. केवळ एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याला देखील लवकरच पकडतील.

हेही वाचा     –      महापालिका निवडणूकांचे बिगुल पुढील तीन महिन्यात वाजणार!

तसेच या प्रकरणातील आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई होणार आहे. या प्रकरणासंदर्भातील सगळी कायदेशीर कारवाई करत असताना त्यांची (पीडित, ग्रामस्त व विरोधक) जी धनंजय मुंडेंसंदर्भातील मागणी आहे, त्या मागणीला कुठलाही मोठा आधार अथवा पुरावा नाही. पुरावा असेल तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. मला वाटतं की सध्या विश्वासाने वातावरण शांत ठेवण्याची आवश्यकता आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button