नागपूरच्या ‘डॉली चाय’ वाल्यासोबत बिल गेट्स यांची चाय पे चर्चा..!
![Bill Gates with Dolly Chai Wala of Nagpur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Bill-Gates-Dolly-ChaiWala--780x470.jpg)
Bill Gates-Dolly ChaiWala Video | मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स हे सध्या भारतात आहेत. या भेटीदरम्यान बिल गेट्स यांनी चक्क चहा विक्रेत्याच्या चहाचा आस्वाद घेतला आहे. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे.
या व्हिडिओमध्ये बिल गेट्स हे डॉली चायवाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या चहा विक्रेत्याच्या स्टॉलवर त्याने बनवलेल्या खास चहाचा आस्वाद घेत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ‘भारतात, तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला नावीन्य पाहयला मिळेल-अगदी साधा कपभर चहा तयार करतानाही!’, असं कॅप्शन देत इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
हेही वाचा – Delhi Metro स्टेशनवर कपलचा रोमान्स; किस करतानाचा Video व्हायरल..
Bill Gates collaborating with Dolly Chaiwala is the most unexpected collaboration I've ever seen. 😭😭 pic.twitter.com/JvYXct93m8
— Prayag (@theprayagtiwari) February 28, 2024
बिल गेट्स हे ‘वन चाय प्लीज’ असं म्हणत, कपभर चहा मागताना दिसत आहेत. यानंतर व्हिडिओमध्ये डॉली चायवाला एका खास कार्टवर बिल गेट्स यांच्यासाठी त्याच्या अनोख्या पद्धतीने चहाचा कप बनवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये गेट्स एका ग्लासमधून गरम चहाचा घोट घेताना देखील दिसत आहेत. या व्हिडीओला इंस्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक लाइक्स आणि चार हजारांहून अधिक कमेंट्स करण्यात आल्या आहेत.