Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी; सरकारने ई-केवायसीबाबत घेतला मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील लाखो महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत असून, अजूनही सुमारे ४५ लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे शासनाकडून एक महिन्याची मुदतवाढ देऊन ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

योजनेच्या अधिकृत माहितीनुसार, ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास १ एप्रिल २०२६ पासून लाभ थांबू शकतो. मात्र, ही मुदतवाढ मिळाल्यास लाभार्थी महिलांना अधिक वेळ मिळेल. अधिकृत पोर्टल ladakibahin.maharashtra.gov.in वर ई-केवायसी ऑनलाइन करता येते.

योजनेच्या लाभार्थींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा १,५०० रुपयाचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. काही अहवालांनुसार, नोव्हेंबर-डिसेंबर एकूण ३,००० हा लाभ एकत्रितपणे जानेवारीमध्ये जमा होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जानेवारीसह तीन महिन्यांचा म्हणजेच ४,५०० रुपयांचा हप्ता एकदम मिळण्याची चर्चाही आहे.

हेही वाचा –  शहापूर-घोटी-विशाखापट्टणम राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किरण जाधव यांनी सांगितले की, सुमारे ३५ टक्के लाभार्थी ई-केवायसी बाकी असून, मुदतवाढ मिळाल्यास लाभ एकत्रित वितरीत होऊ शकतो.

योजनेच्या निकषांनुसार, कुटुंबप्रमुख (पती किंवा वडील) नसलेल्या महिलांची माहिती स्वतंत्रपणे संकलित केली जाणार आहे. यासाठी विशेष संकेतस्थळ/पोर्टल तयार करण्यात आले आहे. अशा महिलांना शिफारस पत्र किंवा इतर पुरावा सादर करून ई-केवायसी पूर्ण करता येईल. यामुळे विधवा, घटस्फोटित किंवा एकल महिला लाभार्थींना सोयीचे होईल.

दरम्यान, लाडक्या बहिणींनी तातडीने ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc वर जाऊन ई-केवायसी पूर्ण करावी. अधिक माहितीसाठी स्थानिक महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button