TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीकांत शिंदेंचा मोठा निर्णय; डोंबिवलीचा ‘रासरंग’ दांडिया यंदा रद्द

दांडिया उत्सवाचा खर्च संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वळवणार; नवरात्रोत्सवाची परंपरा मात्र साधेपणाने कायम राहणार

डोंबिवली : महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील यंदाचा ‘रासरंग’ दांडिया उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी या उत्सवासाठी करण्यात येणारा खर्च यंदा संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डोंबिवलीतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर नवदुर्गा मित्र मंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी ‘रासरंग’ दांडिया उत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र, यंदा राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची कमतरता, पिकांचे नुकसान आणि शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी लक्षात घेऊन उत्सव न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवासाठी होणारा खर्च शेतकरी मदतीसाठी वळवण्यात येणार आहे. कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आणि कोणत्या स्वरूपात मदत करायची, याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा –  Asian Games 2026: अनंतजीत-परिनाझची ‘ब्राँझ’ कमाल; भारताच्या पदकांची संख्या १५ वर

नवरात्रोत्सवाची परंपरा कायम

रासरंग दांडिया उत्सव रद्द करण्यात आला असला तरी नवरात्रोत्सवाची धार्मिक परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. देवीची घटस्थापना, पूजा आणि आराधना साधेपणाने करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील पावसाच्या कमतरतेमुळे खरीप पिकांवर परिणाम झाला असून रब्बी हंगामाच्या पेरण्यांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. 22 सप्टेंबरपर्यंत राज्यात सरासरीपेक्षा सुमारे 17 टक्के पाऊस कमी झाला होता. मराठवाड्यासह काही भागांमध्ये पावसातील मोठ्या खंडामुळे पिकांना फटका बसल्याचे वृत्त आहे.

दुष्काळ जाहीर करण्याच्या औपचारिक प्रक्रियेबाबत राज्य सरकारने 5 ऑक्टोबरनंतर पीक नुकसानीचे मूल्यांकन सुरू करण्याचे सांगितले आहे. त्याआधीही राज्य सरकारकडून आवश्यक मदत करण्याची तयारी सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील लोकप्रिय दांडिया उत्सव रद्द करून त्यासाठीचा निधी संकटग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button