Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

वाकड पोलिसांची मोठी कारवाई, दुचाकी चोरणारी जळगावातील टोळी जेरबंद

पिंपरी : वाकड पोलिसांची मोठी कारवाई केली आहे. दुचाकी चोरणाऱ्या जळगावातील टोळीला पोलिसांनी थेरगावातून अटक केली आहे. त्यांच्याकडून पाच लाखांच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

कमलेश भगत (वय-20), शुभम निकम (वय-20), पुष्पक पाटील (वय-23) आणि प्रज्वल भोसले (वय-24) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. वाकड परिसरातील थेरगाव परिसरात गस्त घालत होते. चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी चोरटे थेरगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. पोलीस दिसताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा – ‘संभाजी भिडेंना अटक करा, नाहीतर हत्या करेन’; माजी राज्यमंत्र्याची धमकी

त्यांनी वाकड, चिखली, येरवडा, पिंपरी, चिचंवड परिसरातून दाहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून पाच लाख रूपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button