कोल्हापूरात भरदिवसा सशस्त्र दरोडा, गोळीबार करत लुटले ३ किलो सोने, पाहा व्हिडीओ..
Kolhapur Robbery Video : सांगलीतील ज्वेलर्सवर पडलेल्या सशस्त्र दरोड्याची घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरात थरकाप उडवणारी घटना घडली आहे. करवीर तालुक्यातील बालिंग्यामधील कात्यायणी ज्वेलर्स या सराफ पेढीवर सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांनी भरदीवसा गोळीबार करत ज्वेलर्समधील पावने दोन कोटींचे दागिने लुटून नेले आहेत.
चार सशस्त्र दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात आणि मारहाणीत दोघे जखमी झाले असून दुकान मालकाची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर गोळीबार झाल्याने जखमी आहेत. दरोडेखोरांनी तब्बल १५ राऊंड फायर केले आहेत. तसेच त्यांनी एक मॅग्झिनही आणली होती. ज्वेलर्समधील फिल्मीस्टाईल दरोडा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
हेही वाचा – ‘शिवसेना एकनाथ शिंदेंनी फोडली नाही तर..’; संजय राऊतांचं मोठं विधान
भरदुपारी टाकलेल्या दरोड्यात तीन किलो सोन्याचे दागिने आणि दीड लाख रूपये रोख असा सुमारे १ कोटी ८२ लाखांचा मुद्देमाल लुटला आहे. गुरूवारी दुपारी दीडच्या दुमारास ही घटना घडली आहे.