TOP News । महत्त्वाची बातमीअध्यात्म । भविष्यवाणीटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमुंबईराजकारणराष्ट्रिय
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडीः वाकडेवाडी बस स्टँडजवळ कंटेनर उलटला…
पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम सुरू
पुणेः
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाकडेवाडी बस स्टँडजवळ कंटेनर उलटल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी बराच वेळ अडकून पडले होते.
घटनेची माहिती मिळताच पुणे वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केली. वाहतूक सुरळीत करताना ट्वीटरवरून माहिती देताना वाहतूक पोलीसांनी सांगितले की, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाकडेवाडी एसटी स्टँड येथे कंटेनर पलटी झाला असून एका लेनमधून दुहेरी वाहतूक चालू करण्यात आलेली आहे.
क्रेन बोलवून कंटेनर बाजूला करून घेण्याचे काम चालू आहे, वाहन चालकांना विनंती आहे त्यानुसार आपले प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहनही पोलीसांनी केले आहे.





