Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, बडा नेता एकनाथ शिंदेंच्या गळाला

नाशिक : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळलं होतं, या निवडणुकीत महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा परभाव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीचे तीन घटक पक्षा भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचे मिळून तब्बल 232 उमेदवार विजयी झाले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला तर दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे, महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये विशेष: भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला आहे.

या पक्ष गळतीचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, यातील काही जणांनी भाजपमध्ये तर काही जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर देखील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. दरम्यान आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – शेतकऱ्यांना गुडन्यूज; केंद्र सरकारकडून तूर खरेदीला 28 मे पर्यंत मुदतवाढ, किती आहे हमीभाव?

नाशिकच्या येवला तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे, विधान परिषदेचे माजी आमदार नरेंद्र दराडे हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार आहेत. ते आता शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुक्तागिरी बंगल्यावर उद्याच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दराडे यांच्यासह त्यांचे समर्थक असलेले ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दराडे यांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यात आहे. या पार्श्वभूमीवर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असू शकतो. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान हे उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button