अरेरे दुर्दैवः किवळे येथे होर्डिंग कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू
![unfortunately, the hoarding collapsed, killing 5 people.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Untitled-design-37-780x470.png)
पिंपरीः वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसापासून संरक्षणसाठी टपरीच्या आडोशाला उभा राहिलेल्या टपरीवर मोठे होर्डिंग पडून भीषण अपघात झाला. किवळे येथे झालेल्या या अपघातमध्ये पाच जणांचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनस्थाळी दाखल झाले असून रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दल देखील तेथे उपस्थित आहे. सहा क्रेनच्या साह्याने हे होर्डिंग बाजुला करण्यात येत असून नेमके यात किती जण अडकले आहेत हे स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील काही भागात आज संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. किवळे येथे आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांना होर्डिंगचा आडोसा घेतला. मात्र, वादळामुळे अचानक हे होर्डिंग पडल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याची माहिती आहे.
जखमीला रुग्णालयात हलवले..
बचाव पथकाने एका जणाला होर्डिंगखालून सुखरुप बाहेर काढले. मात्र, तो गंभीर जखमी असल्याचे दिसून आले. त्याला तत्काळ रुग्णवाहिकेत घालून उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.