राज्य सरकारचा मोठा निर्णय; सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार!

पुणे | राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारच्यावतीने घेण्यात आला आहे. या नियमाची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यात होणार आहे.
राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता सातबाऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा देखील समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. मात्र या निर्णयासाठी राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत. तर १ मे २०२४ नंतर ज्या व्यक्तीचा जन्म होईल अशा व्यक्तींसाठी हा नवा नियम लागू होणार आहे.
हेही वाचा – Pimpri-Chinchwad | प्रवासी महिलेचा विनयभंग करणारा ओला कॅबचालक अखेर गजाआड
दरम्यान, १ मे २०२४ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे. तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे.
विवाहित स्त्रियांबाबत काय आहे पद्धत?
विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार, त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव नंतर तिच्या पतीचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपात नाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार आहे.
महिलेला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नाव नोंदविण्याची मुभा राहील.




