Pune : आयपीएस अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे : पुण्यातील आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर (रा. आंबेगाव बुद्रूक, पुणे) यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात ठाण्यातील कळवा येथील एका ३१ वर्षीय विधवा महिलेकडे त्यांनी शरीर सुखाची मागणी केल्याचे फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आले आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळवा येथील महिलेची त्यांच्याशी फेसबुकवर ओळख झाली होती. अष्टेकर यांनी व्हाट्सअप कॉल केला. त्यावेळी ते स्वतः नग्न होते व त्यांनी महिलेला नग्न होण्याची मागणी केली.
फेसबुकवर ओळख वाढवून अष्टेकर यांनी महिलेची सर्व वैयक्तिक कुटुंबाची माहिती विचारली. पोलिस भरती सुरू असून नोकरीस लावण्याचे आश्वासन देवुन त्यांनी महिलेशी प्रथम बोलण्यास व नंतर त्यांच्याशी जवळीक साधण्यास सुरूवात केली. तसेच व्हॉट्सअप मेसेजेस, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बऱ्याच वेळा महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी केली. मोबाईलवर अश्लील फोटो आणि मेसेजस पाठविण्यास सुरूवात केली. बहिणीच्या मुलाची पोलिस भरतीमध्ये निवड व्हावी म्हणुन पिडीत महिला अष्टेकर यांच्या संपर्कात होती, असे फिर्यादीत म्हटले आहे.





