देशात 5.72 लाख ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण
पिंपरी चिंचवड | भारतात मागील 24 तासांत 46 हजार 148 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 58 हजार 578 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, सध्या 5.72 लाख ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 कोटी 02 लाख 79 हजार 331 एवढी झाली आहे. त्यापैकी 2 कोटी 93 लाख 09 हजार 607 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्या 5 लाख 72 हजार 994 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.देशातील कोरोना मृतांची संख्या 3 लाख 96 हजार 730 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 979 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.30 टक्के एवढा झाला आहे. भारताचा रिकव्हरी रेट वाढून 96.80 टक्के एवढा झाला आहे.
देशात आजवर 40 कोटी 63 लाख 71 हजार 279 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत तर, गेल्या 24 तासांत 15 लाख 70 हजार 515 नमूने तपासण्यात आले आहेत. आयसीएमआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.देशात कोरोना लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 32 कोटी 36 लाख 60 हजार 077 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. देशातील 18 जिल्ह्यात नव्वद टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे.





