breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये अनेक गावांना भूकंपाचे २ धक्के

Maharashtra Earthquake | परभणी, नांदेड, हिंगोली सह वाशिम जिल्ह्याला भूकंपाचा धक्का जाणवला आहे. आज (१० जुलै) सकाळी सहा ते सहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान परभणी २ धक्के जाणवले. तसेच याच दरम्यान हिंगोली नांदेड जालना सह वाशिम जिल्ह्यामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथला असून. हा धक्का जाणवल्यानंतर ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लोक घराबाहेर पडले. दरम्यान, राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राकडूनही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाची तीव्रता ही ४.५ रिश्टर स्केल एवढी होती. बुधवारी सकाळी ६ वाजतााच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या परिसरात भीतीचे वातावरण पसरली आहे. मात्र, घाबरून न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा     –      ‘स्वारगेटपर्यंत मेट्रो ऑगस्ट महिन्यात सुरु होणार’; मुरलीधर मोहोळ

विदर्भातील वाशिम जिल्ह्यासह हिंगोली, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यातील काही भागातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पैठण तालुक्यातील पाचोड येथे सकाळी ७.१५ मिनीटाला धक्के जाणवले. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातही भूंकपाचे धक्के जाणवले. परभणी शहर, सेलू, गंगाखेड, हिंगोलीतील पिंपळदरी, राजदरी, वसमत भागाला सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले. २ महिन्यांपूर्वी सुद्धा या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button