Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून ३ दिवस ब्लॉक
Mumbai-Goa Highway | मुंबई-गोवा महामार्गावर सलग तीन दिवस सकाळ आणि दुपारच्या सत्रात ब्लॉक घेतले जाणार आहेत. कोलाड जवळील पूई येथे नवीन पूलाचे गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी हे ब्लॉक घेतला जाणार आहे. वाहतुक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची वाहतुक अधिकसुचना जारी केली आहे.
११ जुलै ते १३ जुलै या तीन दिवसात हा ब्लॉक घेतला जाणार आहे. सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. याकाळात महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक बंद ठेवली जाणार आहे. प्रवाश्यांनी तसेच वाहनचालकांनी या काळात पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये अनेक गावांना भूकंपाचे २ धक्के
पर्यायी मार्ग कोणते..
वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.
वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.
या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.