Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

‘स्वारगेटपर्यंत मेट्रो ऑगस्ट महिन्यात सुरु होणार’;  मुरलीधर मोहोळ

पुणे : पुणे मेट्रोकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात दोन मेट्रो मार्ग बनवले जात आहेत. एक मार्ग सुरु झाला असून दुसऱ्या मार्गावरील 3.6 किलोमीटरचा सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा टप्पा अद्याप सुरु झालेला नाही. हा टप्पा पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे.

नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (दि. 8) रोजी पुणे मेट्रो कार्यालयाला भेट दिली. त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मेट्रोच्या चालू कामातील आणि विस्तारित मार्गिकेच्या कामातील अडचणी व प्रगती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी सिव्हील कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग ऑगस्ट महिन्यात सुरु होणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा –  वसंत मोरेंची घरवापसी, हाती बांधले शिवबंधन

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग मागील काही महिन्यांपूर्वीच सुरु झाला आहे. यावरील येरवडा मेट्रो स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून तेही प्रवाशांसाठी लवकर सुरु होईल. तर दुसऱ्या मार्गावरील सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या 3.6 किलोमीटर अंतरावरील काम अंतिम टप्प्यात आले आहे. हा मार्ग ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे.दरम्यान, मंडई मेट्रो स्थानकाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. त्यासाठी काही तांत्रिक अडचणी असून त्या पूर्ण होताच तेही मेट्रो स्थानक सुरु होईल.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मेट्रोचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले जात आहे. पीसीएमसी ते निगडी हा 4.5 किलोमीटरचा टप्पा आणि स्वारगेट ते कात्रज हा 5.4 किलोमीटरचा टप्पा केला जाणार आहे. या टप्प्यांच्या कामासाठीचा प्रस्ताव केंद्राच्या मान्यतेसाठी असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला लवकरात लवकर मान्यता देण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री मोहोळ यांनी दिले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button