महिलांना मिळणार दरमहा १५०० , मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना नेमकी काय?

मुंबई | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतील अश्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा त्यांनी केली. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५० रुपये देणार आहे.
महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवली जाणार आहे. महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे.
हेही वाचा – महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटुंबांसाठी
कोणत्या महिलांना लाभ मिळणार?
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील.
२१ ते ६० वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळेल.
ज्यांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिलेच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जाणार.





