ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या आश्वासनावर अपक्ष अर्ज मागे!

मिशन-PCMC: धनगर समाजाच्या सन्मानासाठी अरुण पाडुळे यांचा आदर्श!

पिंपरी-चिंचवड | प्रभाग क्रमांक ११ मधून भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार म्हणून सौ. कविताताई अरुण सुभाष पाडुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानंतर, समाजाच्या हितासाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा भारतीय जनता पार्टीला प्रभाग ११, १२ आणि १ मध्ये होणार आहे.

अरुण पाडुळे यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण भोसरी विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाने भारतीय जनता पक्षाकडे मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या. त्यामुळे समाजातील नेतृत्व करण्याची क्षमता असणाऱ्या कमीत कमी तीन ते चार व्यक्तींना उमेदवारी मिळावी, ही समाजाची भावना होती.

आपल्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजाच्या अस्मितेला प्राधान्य देत, पाडुळे यांनी प्रभागात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक व त्यांच्या नावाचे वाचनालय उभारण्याची मागणी मांडली. ही मागणी चारही भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवारांनी लेखी स्वरूपात मान्य करावी, अशी ठाम अट त्यांनी ठेवली. अन्यथा अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय पाडुळे यांनी स्पष्ट केला होता.

हेही वाचा      :        गावाच्या स्वाभिमानासाठी एकजूट : ताथवडे–पुनावळे–वाकड प्रभागात आदर्श राजकीय निर्णय

कार्तिक लांडगे यांनी या वेळी भावनिक शब्दांत सांगितले, “अरुण, तू काहीही वैयक्तिक मागणी केलेली नाहीस. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे स्मारक व्हावे, यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत.”

यानंतर अधिकृत उमेदवार निलेश नेवाळे, कुंदन गायकवाड, सचिन सानप आणि योगिता नागरगोजे यांनी ही मागणी लेखी स्वरूपात मान्य केली. ही मान्यता पिंपरी-चिंचवड धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष महावीर काळे, समाजाचे जेष्ठ महादेवजी कवितके, पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन वाघमोडे, पोपटजी हजारे, जय हरी ग्रुपचे अध्यक्ष मारुती महाराज शेजाळ, महादेव महाराज शिंदे आदी समाजमान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.

समाजाच्या सन्मानासाठी व पक्षाच्या एकतेसाठी दिलेल्या आश्वासनाच्या आधारे अरुण पाडुळे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. हा निर्णय स्वतःच्या राजकीय संधीपेक्षा समाजाच्या अस्मितेला प्राधान्य देण्याचा प्रतीक असून, अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.

“माझ्या वैयक्तिक स्वार्थापेक्षा समाजाची अस्मिता आणि सन्मान महत्वाचा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक उभारण्याचा विश्वास मिळाला तर समाजाच्या हितासाठी मी नेहमीच कार्य करण्यास तयार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारक उभारणीच्या आश्वासनावर पक्ष आणि समाजाच्या एकतेसाठी निर्णय घेतला.

– अरुण पाडुळे, राष्ट्रीय खेळाडू.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button