Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

राज्यात ‘वैद्यकीय’च्या 150 जागा वाढल्या

मुंबई : आठवडाभरापूर्वी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या १५० जागा वाढल्या होत्या. आता पुन्हा १५० जागांना मान्यता मिळाली असून तिसऱ्या फेरीमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांना ३०० जागा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये पनवेलमधील महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालयामध्ये १००, तर मालती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल कॉलेजमध्ये ५० जागा वाढल्या आहेत.

हेही वाचा –  “हा सण सर्वांचे जीवन आनंद, समृद्धी आणि सौहार्दाने उजळून टाको,” ; राष्ट्रपती अन् पंतप्रधानांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या २ हजार ६५० जागा वाढवल्यानंतर आठवडाभरातच वैद्यकीय समुपदेशन समितीकडून (एमसीसी) आणखी २ हजार ३०० जागा वाढविण्यात आल्या आहेत. २ हजार ३०० जागा वाढविल्याबाबत समितीकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले. नव्याने वाढविण्यात आलेल्या या जागांमद्ये महाराष्ट्रामध्ये पुन्हा १५० जागा वाढल्या आहेत. नव्याने झालेल्या जागा वाढीमुळे लांबणीवर पडलेल्या तिसऱ्या फेरीसाठी तब्बल ४ हजार ९५० जागा उपलब्ध झाल्या आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button