Breaking-newsपिंपरी / चिंचवड

Pimpri-Chinchwad: जयहिंद अर्बन बँकेच्या संचालकावर खुनी हल्‍ला

हॉटेलचे थकीत भाडे मागितल्‍याने हल्ला: तडीपार गुंडासह सहा जणांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल

पिंपरी चिंचवड : मॅनेजरकडे हॉटेलचे थकीत भाडे मागितल्‍याच्‍या कारणावरून सहा जणांच्‍या टोळक्‍याने एका तरुणावर खुनी हल्‍ला केला. ही घटना रविवारी (दि. १९) दुपारी सव्‍वातीन वाजताच्‍या सुमारास हिंजवडीतील बेलबॉटम हॉटेल येथे घडली. ( जयहिंद अर्बन बँकेच्या संचालकावर खुनी हल्‍ला )

अजिंक्‍य धनाजी विनोदे (वय २८, रा. विनोदे वस्‍ती, वाकड) असे टोळक्‍याने केलेल्‍या हल्‍ल्‍यात जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव आहे. ते चिंचवडमधील जयहिंद अर्बन बॅकेचे संचालक आहेत. सुमित भिकनराव संदानशिव (रा. बिजलीनगर, चिंचवड), विकी ऊर्फ प्रथमेश लालासाहेब तिपाले (रा. बिजलीनगर, चिंचवड), अथर्व महेश शिंदे (रा. कात्रज, पुणे), गौतम परशुराम कांबळे (रा. चिंचवड), बंटी शांताराम ठाकरे (रा. मोहननगर, चिंचवड) आणि समाधान (पूर्ण नाव, पत्‍ता माहिती नाही) अशी गुन्‍हा दाखल झालेल्‍या आरोपींची नावे आहेत. याबाबत जखमी अजिंक्‍य विनोदे यांचे मित्र यश नेताजी साखरे (वय २५, रा. आदर्शनगर, हिंजवडी) यांनी रविवारी याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रविवारी दुपारी सव्‍वातीन वाजताच्‍या सुमारास जखमी अजिंक्‍य हे आपले मित्र यश साखरे यांच्‍यासोबत हिंजवडीतील हॉटेल बेलबॉटम येथे गेले होते. त्‍यांनी हॉटेलचे मॅनेजर आरोपी सुमित याला हॉटेलचे थकीत भाडे कधी देणार, अशी विचारणा केली. या कारणावरून यातील एका आरोपीने तुम्‍ही येथे काय आमच्‍याशी भांडणे करायला आलेत का, तुम्‍हाला माहिती आहे का मी चिंचवडचा भाई विकी तपाले आहे. मी चार वर्ष जेल भोगून आलो आहे. आम्‍हाला तुम्‍ही काय हांडगे समजता काय, त्‍यानंतर आरोपी सुमित शिवीगाळ करीतअसताना आरोपी गौतम कांबळे याने शिवीगाळ करीत आज याला जिवंत सोडायचे नाही, असे म्‍हणूत आपल्‍या जवळील चाकूने वार केले. आरोपी बंटी ठाकरे याने पिझझा कापण्‍याच्‍या चकतीने डोक्‍यात वार केले. आरोपी अथर्व शिंदे याने काटेरी चमच्‍याने डोक्‍यात वार केले. आरोपी तिपाले आणि समाधान याने विटा व सिमेंट ब्‍लॉक फेकून मारले व परिसरात दहशत निर्माण केली. हिंजवडी पोलीस यबााबत अधिक तपास करीत आहेत.

विकी तिपाले तडीपार गुंड

सराईत गुन्‍हेगार आरोपी विकी तिपाले याला पोलीस उपायुक्‍त परिमंडळ एक यांनी १० ऑगस्‍ट २०२४ रोजी दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे. मात्र तडीपारीची मुदत पूर्ण होण्‍याआधीत तो शहरात वास्‍तव्‍य करीत असल्‍याचे या घटनेतून दिसून आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button