SSC Result | दहावी बोर्डाचा निकाल जाहीर; दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींची बाजी

SSC Result | शालेय शिक्षणातून पुढच्या शिक्षण प्रवासाची सुरुवात म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल. महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे आज दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचा यंदाचा निकाल हा तब्बल ९४.१० टक्के इतका लागल्याचं मंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून ९ शिक्षण विभागातून तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातून जवळपास १४ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा दहावीला पुणे, नागपूर, छत्रपती संभाजी नगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या ९ विभागीय मंडळात एकूण १५ लाख ५८ हजार २० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ४६ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि त्यापैकी १४ लाख ५५ हजार ४३३ विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९४.१० टक्के आहे, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे
सर्व विभागीय मंडळांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल ९८.८२ टक्के आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८ टक्के आहे. सर्व विभागीय मंडलातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.१४ टक्के असून मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. याचाच अर्थ नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८३ टक्के जास्त आहे.
हेही वाचा : Mission PCMC : पिंपरी-चिंचवड मध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार निवडणूक!
विभागनिहाय निकाल
पुणे – ९४.८१%
नागपूर – ९०.७८%
संभाजीनगर – ९२.८२%
मुंबई – ९५.८४%
कोल्हापूर – ९६.७८%
अमरावती – ९२.९५%
नाशिक – ९३.०४%
लातूर – ९२.७७%
कोकण – ९९.८२%
या वेबसाइटवर पाहता येईल निकाल
1. http://www.mahresult.nic.in
2. http://sscresult.mkcl.org
3. https://ssc.mahresults.org.in