Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

तक्रार करा अन् १०० रूपये मिळवा, PMPML चा नवा फंडा!

पिंपरी : PMPML कडून नव नवे उपक्रम राबवले जातात. आता नागिराकांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्नही सुरू झाले आहेत. यासाठी PMPML ने नवा फंडा आणला आहे. आता नागरिकांनी तक्रार नोंदवल्यास आणि ती योग्य असल्यास १०० रूपये बक्षीस मिळणार आहे, अशी माहिती PMPML ने दिली आहे.

PMPML ने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, ड्युटीवर असताना चालक किंवा वाहक सर्व नियमांचे पालन करतील याची खात्री करण्यासाठी, आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे त्याकरिता आम्ही सर्व नागरिकांना आम्हाला पाठिंबा देण्याची विनंती करतो. कोणताही चालक किंवा वाहक ड्युटीवर मोबाईल फोन वापरताना, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवताना किंवा रुट बोर्ड नसलेली बस चालवताना आढळल्यास पीएमपीएमएल कडे ईमेल: [email protected] किंवा व्हाट्सअँप : 9881495589 द्वारे त्वरित तक्रार करू शकता.

हेही वाचा – ‘..तर संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो’; भाजप नेत्याची खोचक टीका

फोटो / व्हिडिओ, बस क्रमांक, मार्ग क्रमांक, ठिकाण, तारीख आणि वेळ या सर्व तपशीलांसह तक्रार नोंदवण्याची विनंती. तक्रार योग्य असल्यास नागरिकांना ₹ १०० बक्षीस स्वरूपात देण्यात येईल तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर ₹ १००० चा दंड लादण्यात येईल, असं PMPML ने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button