‘..तर संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो’; भाजप नेत्याची खोचक टीका

मुंबई : मुंबई महापालिकेतील कोव्हीड घोटाळ्याप्रकरणी सुजीत पाटकर यांना ईडीने अटक केली आहे. ते ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, सुजीत पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. संजय राऊत यांचा पैसा सुजीत पाटकर सांभाळतो. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर ८९६९ असेल. संजय राजाराम राऊत याने तयारी करावी. संजय राऊत देश सोडून जाऊ शकतात. त्यामुळे लूक आऊट नोटीस काढली पाहिजे. संजय राऊत हिजाब घालून पळून जाऊ शकतो.
हेही वाचा – Tomato : वाढत्या भावामुळे टोमॅटोने भरलेले २० क्रेट चोरी! पुणे जिल्ह्यातील घटना
“सुजीत पाटकर हा संजय राऊत यांचा पार्टनर आहे. संजय राऊत हा चोर आहे. संजय राऊत यांचा पैसा सुजीत पाटकर सांभाळतो. संजय राऊत जास्त दिवस बाहेर राहणार नाही. कैदी नंबर 8969 असेल. संजय राजाराम राऊत याने तयारी करावी. संजय राऊत देश सोडून जाऊ शकतात. त्यामुळे लूक आऊट नोटीस काढली पाहिजे. pic.twitter.com/l5f8NHEsw8
— पवन/Pawan 🇮🇳 (@ThePawanUpdates) July 21, 2023
केंद्र सरकारवर रोज आरोप करायचे हे राऊत यांचे काम होते. उद्धव ठाकरेंचा कामगार आता आत गेला. त्यामुळे संजय राऊत फरार होण्याची भीती आहे. तो देशाबाहेर जाण्याचीही शक्यता आहे. संजय राऊत हिजाब घालून पळून जाण्याचीही शक्यता आहे. त्यांची उलटगणती सुरू झाली आहे. कर नाही तर डर कशाला? काही झाले तरी कारवाई होऊन चोरांचा पार्दाफाश होईल. सरकारने संजय राऊत यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करावी, असं नितेश राणे म्हणाले.





