Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्ज माफी,राज्य सरकारची मोठी घोषणा

नागपूर | महाईन्यूज |
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे …. राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज 21.12.2019 रोजीला विधानसभेत केली.
महविकास आघाडी सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी घोषणेची प्रतिक्षा राज्यातील शेतकऱ्यांना होती. आज विधीमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होणार आहे. शेतकऱ्यांची ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतची कर्जे माफ होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शेतक-यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे नक्की..मात्र या निर्णयाची लवकरात लवकर अंमलबजावणी होणही तितकच महत्वाच आहे.





