breaking-newsपुणेमहाराष्ट्र

वाहने वापरुच नये, अशी परिस्थिती

  • पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनचालक संतापले

पुणे – गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने होणाऱ्या इंधनवाढीमुळे नागरिकांमध्ये नाराजी असून संतप्त प्रतिक्रिया आता उमटत आहेत. पुणे शहरात सोमवारी पेट्रोलचे दर 85.33, डिझेल 72.64, तर पॉवर पेट्रोल 88.09 रुपये इतके होते.

आज जवळपास सर्वांकडेच वापरासाठी स्वतःची वाहने झाली आहेत. यामुळे त्याला लागणारे पेट्रोल, डिझेल एक प्रकारे मूलभूत गरजच झाली आहे. इंधनदरवाढीबाबत सरकारने सर्वसामान्यांचा विचार करुन किंमती आवाक्‍यात राहतील, याचा विचार करायला हवा असे वाटते. सातत्याने होणाऱ्या इंधनदरवाढीमुळे स्वतःचे वाहन बाहेरगावी नेणेही कठीण होत चालले आहे.
– बालाजी पोटे

केंद्र सरकारने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केले आहे. जीवानावश्‍यक वस्तूंच्या किंमती गगनाला भिडत असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. महागाई कमी करू, असे आश्वासन देऊन सरकार सत्तेत आले होते. परंतु पेट्रोलच्या किंमती पाहता त्या आता सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या आवाक्‍याबाहेर गेल्या आहेत. यामुळे अगोदरच पॉकेटमनी कमी असलेल्या विद्यार्थ्यांनी वाहन वापरूच नये, अशी परिस्थिती सरकारने केली आहे.
– कुलदीप आंबेकर

यापूर्वी इंधन दरवाढ वर्षातून एकदा होत असे. मात्र, आता त्यात दररोज बदल होताना दिसत आहे. या परिस्थितीमुळे कधीही दर वाढू शकतो, असे सर्वसामान्यांना वाटते. एकूणच नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न असून सरकारने यावर तातडीने उपाय शोधणे गरजेचे आहे.
– संदेश घिगे

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button