Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज
मुंबई: मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसानं दडी मारलेली आहे. राज्यात पुढच्या 48 तासांत पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा पुढचे दोन दिवस चांगला जोर राहिल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात मुंबई-ठाण्यासह अनेक भागांमध्ये पावसानं जोर धडला होता मात्र त्यानंतर दडी मारलेली आहे. पाऊस गेल्यानं तापमानात वाढ झाली असून उकाड्यानं नागरिक हैराण झाले आहेत. कोकण किनारपट्टीवर पावसानं विश्रांती घेतली असली तरीही गुरुवारी पुन्हा एकदा पालघर, रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे.





