Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/maha_police-6.jpg)
मुंबई : राज्यातील 10 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. दहापैकी काही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या, तर काही नुसत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे उपसचिव कैलाश गायकवाड यांनी राज्यपालांच्या आदेशानंतर पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.
औरंगाबाद कचरा प्रश्नी सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या यशस्वी जाधवांना साईड पोस्टिंग देण्यात आले असून, यशस्वी जाधवांची मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षक, सागरी व व्हीआयपी सुरक्षापदी बदली करण्यात आली आहे.
बदली करण्यात आलेल्या IPS अधिकाऱ्यांची नावं :
यशस्वी जाधव, डॉ. सुहास मधुकर वापरके, अश्वती दोर्जे, डॉ. छेरिंग दोर्जे, के. एम. मल्लिकार्जून, रावसाहेब दत्तात्रय शिंदे, व्ही. के. चौबे, आशुतोष डुंबरे, संतोष रस्तोगी, श्रीकांत के. तरवडे