breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील पोलीस दलामध्ये कोरोनाचं वाढत प्रमाण,बाधितांचा आकडा 786 वर

राज्यातील पोलीस दलामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतच असून आतापर्यंत ७८६ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यातील सात जणांचा मृत्यू झाला असून ७६ जणांनी कोविडवर मात केली आहे.

लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून अहोरात्र प्रयत्नशील असलेल्या राज्यातील पोलीस दलाला कोरोनानं विळखा घातला आहे. ताज्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत तब्बल ७८६ पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. तर, सात जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात रोजच्या रोज कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं सरकारकडून निर्बंध अधिक कठोर केले जात आहेत. गर्दी टाळणं हा कोरोनाची साखळी तोडण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यासाठीच लॉकडाऊन पुकारण्यात आलं आहे. लॉकडाऊनचे निर्बंध पाळले जावेत याची संपूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे. साहजिकच त्यांच्यावर अतिरिक्त ताण येत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना कळत-नकळत पोलीस बाधितांच्या संपर्कात येत असल्यानं त्यांना संसर्गाचा धोका वाढला आहे.

राज्यात आतापर्यंत ७८६ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. बाधित पोलिसांमध्ये ८८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सध्या ७५ अधिकाऱ्यांसह ७०३ पोलिसांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ७६ पोलिसांवर यशस्वी उपचार करून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात १३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर, सात पोलिसांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button